"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

गावाविषयी माहिती

1. बरवाडपाडा  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील शेवटचे आणि दादरा नगर हवेली एवं दिव दमण या केद्रशासित प्रदेश च्या सिमेलगत वसलेले बहुल आदिवासी समुदायाचे एक आदर्श बरवाडपाडा हे गाव आहे. आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळी नंतर ग्रामदानी गावा मध्ये बरवाडपाडा गावाचा समावेश सन १९७८ साली ग्रामदान गाव बरवाडपाडा म्हणून घोषित केले आहे. बरवाडपाडा या गावाची  सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ७१४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे २, उपकेंद्र दवाखाना,  व्यायामशाळा १, सभामंडप- अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सार्वजनिक भागात CCTV बसविले आहेत. सार्वजनिक विहिरी, वयक्तिक शेततळे  व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नगली, तर, वरई, उडीद, खुरासणी प्रमुख पिके घेतली जातात. तुती,भाजीपाला  या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

बरवाडपाडा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बरवाडपाडा गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. ग्रामदान मंडळ बरवाडपाडा यथे सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्लास्टिक टाक्या वापरून “शोषखड्डा ” नावाची नाविन्यपूर्ण पद्धत संपूर्ण घरांना राबविली आहे.  जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच पेयजल आपुर्तिविभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार मार्फत निर्मल ग्राम पुरस्कार सन २००९ , संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये तालुका स्मार्ट पुरस्कार सन२०१७-२०१८ बरवाडपाडा विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव पुरस्कार, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार प्राप्त सन २०१९-२०२०, २०२०-२०२१ व २०२१ -२०२२ पुरस्कार प्राप्त व आर.आर.आबा (पाटील)तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार सन २०२१-२०२२ स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका पातळीवर मिळाला आहे.

ग्रामदान मंडळ बरवाडपाडा अध्यक्ष , पध्यक्ष  व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

बरवाडपाडा गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

2. भौगोलिक स्थान

बरवाडपाडा हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ३८१.०५ हे. (हेक्टर्स) असून त्यापैकी लागवडी योग्य क्षेत्रफळ २८७.४६ हे. (हेक्टर्स) आर आहे. एकूण २७३ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ७१४ आहे. त्यामध्ये  पुरुष  महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन छोट्या प्रमाणात आहे. हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. या भागातील वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण सुमारे सरासरी २३०० ते २८०० मीमी पर्जन्यवृष्टी होते.

3. लोकजीवन

बरवाडपाडा गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात, नागली, वरई, तुर, उडीद, खुरासणी,कुळीद पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक तुरळक प्रमाणात जोड व्यवसाय म्हणून काजू व आंबा यामध्येही कार्यरत आहेत. गावात विविध आदिवासी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक रूढी परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. कुवळी भाजी, मखर, माउली, साथी, डोंगरी देव  तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. हे आदिवासी सण मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. तसेच गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र हे सण देखील साजरे केले जातात. येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बरवाडपाडा च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

5. संस्कृती परंपरा

बरवाडपाडा गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध आदिवासी रूढी-परंपरा जपण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावात वर्षा दिवाळी अगोदर माउली (देवडोंगरी ) तसेच भात कापणी नंतर साती हे सन महत्वाचे असुन या सणांना गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात. गावात लोककला, तारपा नाच, तूर नाच , गरभा नाच, ढोल नाच ,  गौरीनाच  भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते. स्रीयांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्यता बचत गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे बरवाडपाडा  गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

6. प्रेक्षणीय स्थळे

7. गाव दैवताचे मंदिर – गावातील प्रमुख गावाच्या वेशीवर दक्षिणमुखी गाव देवी आहे. तसेच मौजे खेत्रीपाडा येथे उत्तरमुखी वाघोबा देवस्थान आहे. आदिवासी रूढी-परंपरेनुसार गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात..

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


263
714
364
350

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo